पर्यावरण संतुलनासाठी वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटेशन गरजेचे
कुंदन हाते यांचा सल्ला.................................................................................................
नागपूर- पर्यावरणात प्रत्येक प्राण्याला महत्त्व आहे. त्यातूनच ही सायकल मेंटेन होते. मात्र मानवाच्या अतिक्रमणांमुळे जंगलातील अऩेक प्राणी संकटात आहेत. त्यांना वाचवायचे असेल तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफीतून डॉक्युमेंटेशन होणे गरजेचे आहे. नव्या दमाच्या तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मानद वन्य जीव संरक्षक कुंदन हाते यांनी येथे केले.
नागपूर प्रेसफोटोग्राफर्स असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ ऑफ नागपूर ऑरेंज सिटी, आरएस मुंडले धरमपेठ आर्ट्स अॅन्ड कॉमर्स कॉलेजतर्फे आयोजित पाच दिवसीय कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या बारकाव्यांवर हाते यांनी मार्गदर्शन केले. हाते म्हणाले, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ही कला संवेदनशीलतेने जपावी लागते. त्यासाठी सर्वांत प्रथम निरीक्षण आणि जंगल वाचायचे कसब आत्मसात करणे आवश्यक असते. त्यामुळे वन्य जीवांचे संरक्षण करायचे असेल तर या क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱ्यांनी आधी निरीक्षणाचा बेस पक्का करायला हवा. या क्षेत्रात संयम खुप आवश्यक असतो. एकेका फ्रेमसाठी तासंतास कधी कधी दिवस दिवस वाट पहावी लागते. इथे संयम सुटला तर हवे ते स्नॅप मिळणार नाहीत. नुसता वाघ म्हणजे जंगल नाही. तर जंगलात वाघासोबतच खुप काही पहाण्यासारखे असते. दुर्मिळ प्रजातींचे देखील अनेकदा दर्शन घडते.
त्यामुळे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करताना प्राण्यांचे, जंगलाचे मानसशास्त्र समजून घेणे आवश्यक असते. बदलत्या ऋतूचक्रानुसार जंगलातही अनेक बदल घडत असतात. हे बदल टिपता आले पाहिजेत. आपसांतील हल्ले आणि शिकाऱ्यांमुळे जंगलातील प्राणी देखील अनेकदा जखमी होतात. मात्र त्यांच्या विषयी फारशी माहिती नसल्याने उपचाराची दिशा ठरविताना पशूचिकित्सकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटेशन कामाला येऊ शकते. त्यामुळे करीअर म्हणून हे क्षेत्र निवडायचे असेल तर यातून फारसे अर्थार्जन होणार नाही. मात्र वन्य जीवांच्या संवर्धनासाठी तुम्ही मोलाची भूमिका निभावू शकता, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
superb response to nppa workshop..congratulation Nagpur press photographers Association ..cheers!!!!
ReplyDelete