समोर दिसणाऱ्या प्रसंगाकडे संवेदनशीलतेने पहात तो क्षण कॅमेरात कैद
करण्याचे माध्यम म्हणजे फोटोग्राफी. त्यामुळे या क्षेत्रात स्वतःचे नाव
कमवायचे असेल, तर संवेदनशीलता, कल्पकता आणि संयम ही त्रीसूत्री बाळगणे
गरजेचे असते. हे गूण नसतील तर प्रकाश किरणांच्या या कलेत स्वतःचे स्थान
निर्माण करता येऊ शकणार नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ छायाचित्रकार अरविंद
पुरंदरे यांनी बुधवारी येथे मार्गदर्शन केले. तत्पूर्वी ज्येष्ठ
छायाचित्रकार विवेक रानडे यांच्याहस्ते फोटो क्लिक करून कार्यशाळेचे
औपचारिक उद्घाटन केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष संदिप चटर्जी अध्यक्षस्थानी
होते. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. संध्या नायर, भाजपाचे नेते देवेंद्र
दस्तूरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रानडे म्हणाले,
प्रत्येकात एक कलावंत दडलेला असतो. कॅमेरा हे केवळ एक टूल आहे. त्याला
व्हिजन, क्रिएटिव्हिटी आणि संवेदनशीलतेची जोड द्याल, तर तुम्ही देखील उत्तम
छायाचित्रकार होऊ शकता. चटर्जी म्हणाले, फोटोग्राफी म्हणजे नुसती फ्रेम
नाही तर तर ती एक भाषा आहे. त्यामुळे तुम्ही जितका सराव कराल तितके हे
माध्यम अधिक खुलते. प्राचार्या नायर म्हणाल्या, छायाचित्रण म्हणजे जीवनाकडे
डोळसपणे पाहण्याचे माध्यम आहे. हे व्हिजन देण्यासाठी ही कार्यशाळा
निश्चितपणे तुम्हाला मदत करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. नाझनिन
पाटणी हीने कार्यक्रमाचे सुरख सूत्रसंचालन केले. |
No comments:
Post a Comment