Nagpur Press Photographers Association
NPPA.
Wednesday 21 June 2017
Friday 21 August 2015
नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन आणि ऑरेंज सिटी वाटर अरणि गडेकर कार्डस् च्यावतीने ‘जागतीक छायाचित्रण दिन’ निमीत्त चिटणवीस सेंटर सिव्हिल लाइन्स येथे आयोजित केलेल्या १८ ते २० ऑगस्ट २०१५ या तीन दिवसीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनी मध्ये विदर्भातील व्यवसायीक आणि हौशी गटातील छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता
नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन आणि ऑरेंज सिटी वाटर अरणि गडेकर कार्डस् च्यावतीने ‘जागतीक छायाचित्रण दिन’ निमीत्त चिटणवीस सेंटर सिव्हिल लाइन्स येथे आयोजित केलेल्या १८ ते २० ऑगस्ट २०१५ या तीन दिवसीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनी मध्ये विदर्भातील व्यवसायीक आणि हौशी गटातील छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाल्याने या प्रदर्शनी चांगल्याने पार पडली.या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले, व्यवसायीक गटात पहिले पारितोषिक संजय आगाशे अकोला, दुसरे मनोज बिंड अमरावती, तिसरे रोहित निकोरे अमरावती तसेच प्रोत्साहन पर पारितोषिक नेहा पटले आणि योगेश शर्मा बुलढाणा आणि हौशी गटात पहिले पारितोषिक दिग्वीजय लांडे, दुसरे सोनाली भट, तिसरे दिव्यांश गुप्ता तसेच प्रोत्साहन पर पारितोषिक वेदांग चावडा आणि आल्हाद ठाकरे यांना देण्यात आले.# हे सर्व पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले त्यांची नावे याप्रमाणे आहे. अजय पाटिल, प्रगती पाटिल, ओसीडब्लु चे सचिन द्रवेकर, आमदार प्रकाश गजभिये, संजय चिंचोळे, धर्मपाल मेश्राम, देवेन्द्र दस्तुरे, संगिता महाजन, राजा वर्मा, रघु नेवरे आणि एनपीपीए चे अध्यक्ष राजेश टिकले आणि सचिव अनंत मुळे उपस्थित होते. आणि सुत्रसंचालन कल्याणी साहू यांनी केले
Tuesday 21 July 2015
Monday 30 March 2015
The Nagpur Union Working Journalists (NUWJ), Tilak patrakar Bhavan Trust and Nagpur Press photographers Association (NPPA) jointly organised a 'Shraddhanjali Sabha' to pay tributes to late Ashok Sawane on today at Tilak Patrkar Bhavan. Here on Monday,March 30,2015
The Nagpur Union Working Journalists (NUWJ), Tilak patrakar Bhavan Trust and Nagpur Press photographers Association (NPPA) jointly organised a 'Shraddhanjali Sabha' to pay tributes to late Ashok Sawane on today at Tilak Patrkar Bhavan. Here on Monday,March 30,2015 in number of prominent personalities were present and paid tribute to late Ashok Sawane for his excellent contribution in the field of photo-journalism.Sawane passed away on March 24, 2015 following a prologed illness. Former MP Banwarilal Purohit Managing Editor of The Hitvada, Group Editor of Dainik Bhaskar and member of Press Council of India Prakash Dubey, and Editorial Advisor of Lokamt Times M. Y. Bodhankar, and other senior journalists and photo journalists were present on this 'Shraddhanjali Sabha'
To paid tribute, dignitaries expressed their emotions in different ways. Former MP Banwarilal Purohit expressed that he was a master photographer and guide of hundreds of reporters who grew under his watchful eyes.
Photo courtesy :Sanjay lachuriya/Lokmat ,.Pratik Barsagade/Sakal, Vijay jamgade/Punya Nagari
Thursday 20 November 2014
Monday 3 November 2014
एनपीपीएच्या कार्यशाळेचा समारोप november 02,2014
नागपूर : नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ इंडिया नागपूर ऑरेंज सिटी यांच्यातर्फे नवोदीत छायाचित्रकारांसाठी कार्यशाळा सुरू होती. त्याचा समारोप रविवारी धरमपेठ कला आणि वाणिज्य महाविध्यालयात झाला. यामध्ये जाहिरात क्षेत्रातील नामांकित छायाचित्रकार मनिष राऊत यांनी प्रशिक्षणार्थींना धडे दिले. क्लबचे अध्यक्ष संदीप चटर्जी, डॉ. संध्या नायर, मिस इंडियात ठसा उमटविणारी लोपामुद्रा राऊत, सत्येंद्र वर्मा आदी उपस्थित होते. अरविंद पुरंदरे, कुंदन हाते यांनीही मार्गदर्शन केले. अहमद कादर व कुणाल गडेकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
Thursday 30 October 2014
NPPA WORKSHOP DAY -2 पर्यावरण संतुलनासाठी वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटेशन गरजेचे कुंदन हाते यांचा सल्ला..
पर्यावरण संतुलनासाठी वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटेशन गरजेचे
कुंदन हाते यांचा सल्ला.................................................................................................
नागपूर- पर्यावरणात प्रत्येक प्राण्याला महत्त्व आहे. त्यातूनच ही सायकल मेंटेन होते. मात्र मानवाच्या अतिक्रमणांमुळे जंगलातील अऩेक प्राणी संकटात आहेत. त्यांना वाचवायचे असेल तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफीतून डॉक्युमेंटेशन होणे गरजेचे आहे. नव्या दमाच्या तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मानद वन्य जीव संरक्षक कुंदन हाते यांनी येथे केले.
नागपूर प्रेसफोटोग्राफर्स असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ ऑफ नागपूर ऑरेंज सिटी, आरएस मुंडले धरमपेठ आर्ट्स अॅन्ड कॉमर्स कॉलेजतर्फे आयोजित पाच दिवसीय कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या बारकाव्यांवर हाते यांनी मार्गदर्शन केले. हाते म्हणाले, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ही कला संवेदनशीलतेने जपावी लागते. त्यासाठी सर्वांत प्रथम निरीक्षण आणि जंगल वाचायचे कसब आत्मसात करणे आवश्यक असते. त्यामुळे वन्य जीवांचे संरक्षण करायचे असेल तर या क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱ्यांनी आधी निरीक्षणाचा बेस पक्का करायला हवा. या क्षेत्रात संयम खुप आवश्यक असतो. एकेका फ्रेमसाठी तासंतास कधी कधी दिवस दिवस वाट पहावी लागते. इथे संयम सुटला तर हवे ते स्नॅप मिळणार नाहीत. नुसता वाघ म्हणजे जंगल नाही. तर जंगलात वाघासोबतच खुप काही पहाण्यासारखे असते. दुर्मिळ प्रजातींचे देखील अनेकदा दर्शन घडते.
त्यामुळे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करताना प्राण्यांचे, जंगलाचे मानसशास्त्र समजून घेणे आवश्यक असते. बदलत्या ऋतूचक्रानुसार जंगलातही अनेक बदल घडत असतात. हे बदल टिपता आले पाहिजेत. आपसांतील हल्ले आणि शिकाऱ्यांमुळे जंगलातील प्राणी देखील अनेकदा जखमी होतात. मात्र त्यांच्या विषयी फारशी माहिती नसल्याने उपचाराची दिशा ठरविताना पशूचिकित्सकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटेशन कामाला येऊ शकते. त्यामुळे करीअर म्हणून हे क्षेत्र निवडायचे असेल तर यातून फारसे अर्थार्जन होणार नाही. मात्र वन्य जीवांच्या संवर्धनासाठी तुम्ही मोलाची भूमिका निभावू शकता, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
Subscribe to:
Posts (Atom)