कधीकधी एक छायाचित्र हे शंभर शब्दांपेक्षा सरस ठरते.
त्यामुळे वृत्तपत्राच्या अस्तित्त्वामध्ये छायाचित्रांचे अत्यंत
महत्त्वपूर्ण योगदान आहे. गेल्या काही वर्षांत कॅमेऱ्यामध्ये आलेल्या
आधुनिकतेमुळे छायाचित्रणाचे काम सोपे झाले आहे. मात्र, वृत्तपत्रात काम
करणाऱ्या छायाचित्रकारासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नाही, त्यासोबतच दृष्टी
असणेसुद्धा अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विकास
मिश्रा यांनी सोमवारी येथे केले. जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त नागपूर प्रेस फोटोग्राफर
असोसिएशनतर्फे टिळक पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका
कार्यक्रमादरम्यान शहरातील ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर महाकाळकर आणि
भाऊ रिंगे यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांच्या प्रकृती
अस्वास्थामुळे त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वरिष्ठ
पत्रकार विजय फणशीकर, साउथ पॉइंट स्कूलचे संचालक देवेंद्र दस्तुरे, अजय
पाटील, अहदम कादीर, अनंत मुळे, राजेश टिकले आदी मान्यवर उपस्थित होते. .
--
wonderful job
ReplyDelete